Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखलखलील शेख आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल
खलील शेख आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई 

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह १० जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणात अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ जारी करत काही व्यक्तींची नावं घेतली होती. वेगवेगळ्या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा दावा होता. त्यातला एक व्यवहार पुण्यातल्या रविवार पेठेतल्या वक्फ बोर्डाच्या जागेचा होता.

पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या वक्फ बोर्डाच्या जागेवर उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीकडून इमारत बांधण्यात येत होती. यामध्ये खलील शेख यांच्यासोबत प्रतिभा धंगेकर, वर्षा शेडगे यांच्यासह पाच भागीदार होते. मात्र हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता, या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी याप्रकरणी तेव्हा भाजपर आरोप केले होते.

या प्रकल्पातील पाचही भागीदार कर्ज भरु न शकल्याने शेख खलील यांनी आत्महत्या केल्याचा दावा, रवींद्र धंगेकर यांनी केला होता. मात्र खलील शेख यांनी व्हिडीओत दावा केला होता की, बाळा शेडगे आणि रवींद्र धंगेकर यांनी ५० लाख दिले नाहीत, त्यामुळे आत्महत्या करीत आहे.. यासह इतरांनीही फसवलं असल्याचं शेख व्हिडीओत म्हणाले होते.

"आम्ही कुठल्याही व्यवहारात नव्हतो. या व्यवहारातून आम्ही २०२५ लाच बाहेर पडलो होतो. हा प्रोजेक्ट हा राजकारणाचा बळी ठरलेला प्रोजेक्ट आहे. मी आमदार झालो म्हणून प्रोजेक्टचं नुकसान झालेलं आहे. आम्ही सगळे भागीदार या प्रोजेक्टमुळे देशोधडीला लागलेलो आहोत." अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.