२ लाख ३५ हजारांचे १४ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
पूजा फडके
मिरज : खरा पंचनामा
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निरनिराळ्या ठिकाणी गहाळ झालेली तब्बल २ लाख ३५ हजार रुपये किमतीची १४ मोबाईल संच शोधून ती मूळ मालकांना परत करण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर गांभीर्याने दखल घेत सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गहाळ मोबाईल शोधण्याची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे यांनी तांत्रिक माहितीच्या (Technical Intelligence) आधारे तपास चक्र फिरवले. विविध ठिकाणांवरून तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून पोलिसांनी सुमारे २,३५,०००/- रुपये किमतीचे १४ मोबाईल हस्तगत केले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे सर्व मोबाईल संबंधित तक्रारदार नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून सुरक्षितरीत्या सुपूर्द करण्यात आले. आपले गहाळ झालेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे आभार मानले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.