Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'११२' डायल करा अन् मिळवा सर्व प्रकारची आपत्कालीन मदत! सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नागरिकांना आवाहन

'११२' डायल करा अन् मिळवा सर्व प्रकारची आपत्कालीन मदत! 
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नागरिकांना आवाहन

सांगली : खरा पंचनामा 

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी सांगली पोलिसांकडून '११२' (Emergency Response Support System) हा एकमेव हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. "आपली सुरक्षा, आमची जबाबदारी" या ब्रीदवाक्यासह २४ तास ही सेवा जनतेच्या सेवेत सज्ज आहे. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी घाबरून न जाता नागरिकांनी थेट ११२ क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केले आहे.

'११२' हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवा:
 * पोलीस मदत: गुन्हेगारी, भांडण, छळ, अपघात आणि संशयित हालचाली रोखण्यासाठी.

 * वैद्यकीय आपत्कालीन मदत: गंभीर आजारपण, रस्ते अपघात किंवा प्रसूती काळात तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी.

 * अग्निशमन सेवा: कुठेही आग लागल्यास, गॅस गळती झाल्यास किंवा स्फोटाच्या घटनेत त्वरित मदतीसाठी.
 * महिला सुरक्षा: छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार, धमकी आणि स्टॉकिंग (मागोवा घेणे) यांसारख्या प्रकारांवर त्वरित कारवाईसाठी.

 * रस्ता अपघात व वाहतूक मदत: अपघात किंवा वाहतूक कोंडी निरसनासाठी.

सेवांची प्रमुख वैशिष्ट्ये:
 * २४/७ तत्परता: २४ तास आणि ३६५ दिवस अखंडित सेवा.

 * त्वरित लोकेशन ट्रॅकिंग: अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे अचूक लोकेशन तात्काळ मिळते.

 * कमी वेळेत प्रतिसाद: कॉल प्राप्त होताच अवघ्या काही मिनिटांत पोलीस अथवा संबंधित पथक घटनास्थळी दाखल होते.

 * प्रशिक्षित कर्मचारी: सुसज्ज आणि अत्यंत कुशल अधिकारी नागरिकांच्या मदतीसाठी तैनात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.