Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळतंय हे पक्षातील अतृप्त आत्म्याना कसे सहन होईल? झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर...

राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळतंय हे पक्षातील अतृप्त आत्म्याना कसे सहन होईल? 
झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर...

मुंबई : खरा पंचनामा 

विरोध करणारा सचिदानंद बाबा कुणाच्या जिवावर नोटीस पाठवतोय हे तर शोधावेच लागेल. राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळत आहे आणि या नेतृत्वाची वाटचाल दादांच्या विचारावर उत्तम होते आहे, हे पक्षातील अतृप्त आत्म्याना कसे सहन होईल बरे? पण झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर अजितदादांचे 'तळागाळातील' कार्यकर्ते या झारीतील शुक्राचार्याना 'तळागाळात' नेऊन टाकतील हे अधोरेखित करून ठेवा. असेम्हणत राष्ट्रवादीचे माजी आमदार आणिनेते अमोल मिटकरींनी भाष्य केलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच असल्याचेही त्यांनी आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्येम्हटलं आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचीसर्वस्वीसूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडेआहे. मात्र असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत खदखद सोमवारी उघड झाल्याने अनेकचर्चानाउधाण आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देणारी कायदेशीर नोटीस बजावली होती. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले आहे का, असा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेअमोल मिटकरी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच असल्याचे म्हटलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सगळ्याबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले कि, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संवादाची प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष खदखदत असल्याचा दावा ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केला.

सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड अवैध असून त्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवून राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाला जाब विचारलाआहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं कि, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीतील त्रुटी दूर होणे गरजेचे आहे. मी कायदेशीर नोटीस पाठवण्यामागे कोणतेही राजकारण नाही. नैसर्गिक न्यायाचा माझा आग्रह आहे. सुनेत्रा पवार यांची निवड होताना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली नाही. मी या चुका सुधारण्यासाठी पत्र पाठवले, पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही, असेही सच्चिदानंद सिंह यांनी म्हटले. मी तीन महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवार यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. मात्र, ते पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वाकडून गांभीर्याने घेण्यात आले नाही आणि मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिणामी मी सुनेत्रा पवार यांच्या निवडीविरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. आता न्यायालयाने सुनेत्रा पवार यांची निवड योग्य असल्याचा निर्वाळा दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही. मी आता याप्रकरणात कोणीही वैयक्तिक चर्चा केली तरी माझ्या निर्णयापासून ढळणार नाही, असे सच्चिदानंद सिंह यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.