Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, तर गोपाल रावांना बैठकीबाहेरच रोखले

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, तर गोपाल रावांना बैठकीबाहेरच रोखले

अयोध्या : खरा पंचनामा 

अयोध्येतील राम मंदिर हे जगभरातील हिंदूंच्या आस्थेचा केंद्र ठरलं असून अनेक शतकांच्या लढ्यानंतर हे मंदिर अयोध्येत उभं राहिलं आहे. त्यामुळे या मंदिरात भाविकांची ही प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पण गेल्या काहि दिवसांपासून देणगी चोरीच्या प्रकरणामुळे कोट्यावधी भाविकांच्या आस्थेला धक्का बसला आहे. त्यानंतर सरकारकडून या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानंतर झालेल्या चौकशीनंतर आठ जणांना अटक करण्यात आली. आता या बैठकीदरम्यान महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी चंपत राय यांचा ट्रस्टमधील राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना देणगी चोरी प्रकरणी वारंवार प्रश्न विचारले जात होते आणि याचदरम्यान त्यांनी राजीनामा दिला होता. अनिल मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता. या राजीनाम्यांवर निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. चंपत राय आता ट्रस्टच्या महासचिव पदावर राहणार नाहीत. तथापि, ट्रस्टच्या नियमांनुसार, ते सदस्य म्हणून कायम राहतील, परंतु त्यांना कोणतीही महत्त्वाची माहिती उपलब्ध होणार नाही.

महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली आज (6 जुलै) दुपारी ३ वाजता बैठकीला सुरुवात झाली. त्यांनी सर्वप्रथम या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. त्यानंतर खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी बैठकीचा अजेंडा सादर केला. स्वामी गोविंद देव गिरी यांनी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांवर विचार करण्याचा प्रस्ताव मांडला. ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितले की, या घटनेमुळे श्रद्धेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोविंद गिरी यांनी सांगितले की, एक गंभीर चूक झाली आहे. यामुळे रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. काही बाबींमध्ये त्रुटी होत्या, ज्या त्यावेळी लक्षात आल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, चंपत राय आणि अनिल मिश्रा एकत्र उपस्थित होते, परंतु त्या दोघांपैकी कोणीही बैठकीला हजर राहिले नाही.

ट्रस्टच्या बैठकीत, कृष्ण मोहन यांनी एफआयआर दाखल करण्यामागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, प्राथमिक तपासात अनियमितता उघडकीस आल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. कृष्ण मोहन यांच्या मते, प्रथमदर्शनी तथ्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, प्रकरणाचा निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी एफआयआर तात्काळ दाखल करण्यात आला. कृष्ण मोहन म्हणाले की, लोकांचा विश्वास जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. ट्रस्टमध्ये बदल करूनच विश्वास जिंकता येतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.