Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"दिल्लीतील आंदोलनात स्वार्थी मंडळी घुसली"

"दिल्लीतील आंदोलनात स्वार्थी मंडळी घुसली"

मुंबई : खरा पंचनामा 

नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांकचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनालात पाठिंबा देण्यात यांच्या अनेक राजकीय मंडळी आणि संघटना आपल्या स्वार्थापोटी घुसल्याने हे आंदोलन भरकटल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे किंवा लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणी परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ते कारवाई केली पाहिजे. ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात फिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ कसा पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात.

दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भासता येईल हा प्रयत्न करतायेत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही, यांचा नीट परीक्षा आता पेपर कुठेशी काही संबंध नाही असे मंडळीही केवळ अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनात बसली आहेत. या आंदोलनाच्या आडून अराजकता कशी तयार करता येईल असे प्रयत्न करतात. दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशाप्रकारे नेतृत्वहीन आंदोलनात गोंधळ उडाला. पोलिसांच्या गाड्या फोडल्या, दगडफेक केली अशा अनेक गोष्टी घडल्या. कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठी चार्ज करणं हे कधीच आवडत नाही पण काल ज्या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचा आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

या आंदोलनात काही लोक चांगल्या भावनेने देखील सहभागी झाले होते. पण काही लोकं आपला स्वार्थ साधायचा आहे म्हणून आंदोलन करीत होते. पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगले असू शकतात. त्यांच्याबद्दल बोलायचं नाही पण हे तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोकं आपला अजेंडा घेऊन शिरलेले होते. काही राजकीय पक्ष ज्यांना त्याच्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेला आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असे प्रयत्न करतात असा आरोपही फडणवीस यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.