पंतप्रधान मोदींचा भार कमी होणार!
हा दिग्गज नेता थेट उपपंतप्रधान? दिल्लीत हालचालींना वेग
नवी दिल्ली : खरा पंचनामा
देशाच्या राजकारणात गेल्या काही काळापासून हालचालींना वेग आला आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील खासदारांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच एक बड्या नेत्याला थेट उपपंतप्रधानपदाची जबाबदारी मिळू शकते. याबाबत दिल्लीत हालचालींना वेग आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपची नवी संघटनात्मक टीम जवळपास तयार झाली आहे. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या फेरवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या खात्यात बदल केला जाऊ शकतो. तसेच काही युवा नेत्यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते.
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच हा फेरबदल होऊ शकतो. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नव्या टीमची घोषणा आणि मंत्रिमंडळ विस्तार हे एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. काही केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. त्यांच्या जागी इतर नेत्यांना संधी दिली जाऊ शकते.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणखी मोठी जबाबदारी मिळू शकते. काही राजकीय जाणकारांच्या मते, आगामी फेरबदलात त्यांची थेट उपपंतप्रधानपदी नियुक्ती होऊ शकते. सध्या अमित शाह हे केंद्र सरकार, पक्ष संघटना आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जर त्यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली, तर भविष्यातील नेतृत्वाबाबत भाजपकडून हा मोठा संदेश असणार आहे. कारण भविष्यात मोदींनंतर त्यांच्याकडे पंतप्रधानपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.