Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खडकवासला धरण भरले!नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा

खडकवासला धरण भरले!
नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा

पुणे : खरा पंचनामा 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या  पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आज  हे धरण ७६ टक्के क्षमतेने भरले आहे.

धरण क्षेत्रात होत असलेली पावसाची अतिवृष्टी आणि धरणात येणारी पाण्याची आवक पाहता, काही तासांतच हे धरण ८० टक्केहुन अधिक भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात केव्हाही पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीपात्राच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना आणि नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.