१८ ते ३५ वयोगटात HIVचा वाढता धोका; कर्नाटकातील ७ हजार विद्यार्थी बाधित, सरकारची विशेष मोहीम सुरू
बंगळूरू : खरा पंचनामा
कर्नाटकातमागील काही काळापासून तरुणांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एचआयव्ही संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे पाऊल उचलले आहे. राज्य ए प्रतिबंधक सोसायटीच्या विशेष निर्देशानंतर सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित (एडेड) आणि खासगी महाविद्यालयांमध्ये नियमितपणे एचआयव्ही चाचणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणांमधील संसर्गाची वेळीच ओळख पटवणे आणि त्यांना योग्य मोफत समुपदेशन उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
नॅशनल ए कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत कर्नाटक संपूर्ण देशात तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या राज्यात सुमारे २.६० लाख लोक एचआयव्हीसह जगत आहेत. यापैकी २.०५ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर धक्कादायक बाब म्हणजे सुमारे ५४ हजार लोकांना आपल्याला संसर्ग झाला आहे याची पुसटशी कल्पनाही नाही. आरोग्य विभागासाठी ही सर्वांत मोठी चिंतेची बाब ठरत आहे.
कर्नाटकच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आपल्या सर्व संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांना एकात्मिक आरोग्य शिबिरे घेण्याचे निर्देश दिले आहेत. 'मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा (एमएएस) या विशेष कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवली जाणार असून यात एचआयव्हीसह हिपॅटायटीस-बी आणि सिफिलीस यांसारख्या आजारांवरही मार्गदर्शन केले जाईल.
आकडेवारीनुसार, १८ ते ३५ या वयोगटात एचआयव्हीचा ससर्ग सर्वात वेगाने वाढत आहे. २०२३-२४ मध्ये या वयोगटातील बाधितांची संख्या ४४,५०० होती, ती २०२५-२६ मध्ये वाढून तब्बल ६६,६०० वर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या दोन वर्षात यात मोठी वाढ झाली ते २५ वयोगटातील ७,००० हून अधिक महाविद्यालयीन विद्याथ्यांना आहे. ताज्या आकडेवारीनुसार, १८ नुकतीच एचआयव्ही संसर्गाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
कुलगुरू एस. विद्याशंकर यांनी सांगितले की, हा एक संवेदनशील विषय आहे. सर्व महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत की, कोणत्याही विद्यार्थ्यांची ओळख उघड होणार नाही याची खात्री करावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही. ही मोहीम ८ महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा समावेश असेल, तर १२ ऑगस्ट (युवा दिन) रोजी पथनाट्ये, पलॅश मॉब आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एड्सबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.