नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
दिल्ली/काठमांडू : खरा पंचनामा
नेपाळमध्ये आलेल्या अचानक भीषण पुरामुळे मोठी हानी (Nepal Floods) झाली आहे. या जलप्रलयामुळे इमारती, गावच्या गावं, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. या पुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून 1200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
या घटनेनंतर 290 भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्रिशूली हायड्रोपॉवरच्या बोगद्यात अडकलेल्या 350 मजूर आणि कर्मचाऱ्यांची नेपाळी लष्कराच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे. या जलविद्युत प्रकल्पात अनेक भारतीय मजूरही काम करत होते. बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांना बाहेर काढण्यात नेपाळी लष्कराला यश आले आहे.
नेपाळ सरकारच्या प्लॅनेट लॅब्स आणि लँडसॅटच्या उपग्रह छायाचित्रांच्या विश्लेषणातून समोर आलेल्या अहवालानुसार, रसुवागढी सीमेपासून सुमारे 18 किलोमीटरवर ल्हेंदे नदीचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला आहे. या अडथळ्यामुळे नदीच्या किनारी भागात तात्पुरत्या स्वरूपाची एक सरोवरसदृश जलराशी तयार झाली आहे. नेपाळ सरकारने याबाबत इशारा जारी केला असून, या नैसर्गिक सरोवराचा बांध फुटल्यास खालच्या भागातील परिसरात अचानक भीषण पूर येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
नेपाळच्या दुर्घटनेत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजनांनी संवाद साधलाय. नेपाळ टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या संचालिका श्रीमती ठक्कर यांच्याशी संवाद साधला. नेपाळच्या तिबेटमध्ये आलेल्या महापुरात महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले आहेत, त्यापैकी 53 नागरिक सुखरूप असून मानसरोवर परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतीलही अनिल महाजन आणि त्यांचं कुटुंबीय नेपाळमध्ये अडकले आहेत. मात्र एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. नेपाळमध्ये अडकलेले नागपूरचे 106 प्रवासी काठमांडूवरून सुखरुप रवाना झालेत. तर ठाण्यातील 9 पर्यटकांशी संपर्क झालेला नाहीय. ठाणे जिल्हा प्रशासन त्यांच्या नातेवाईकांच्या आणि नेपाळ प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तर रायगडमधील 37 नागरिक अडकल्याची माहिती आहे.
लँगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तर उतारावर सुमारे 5200 मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा खालचा भाग तुटून सुमारे 1200 मीटर खाली दरीत कोसळला. त्यामुळे ल्हेंदे खोला नदीत जाऊन पडल्याने नदीचा प्रवाह अडला आणि तिथे तात्पुरता बांध तयार झाला. हा बांध फुटल्यानंतर पाणी, चिखल, दगड आणि मोठ्या प्रमाणात मलब्याची प्रचंड लाट वेगाने खालीच्या दिशेने वाहू लागली. ल्हेंदे खोला ही तिबेटमधून वाहत येणारी एक उपनदी असून, ती नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी आणि तिमुरे परिसरात भोटेकोशी नदीला मिळते. ग्लेशियर कोसळल्याने किंवा आइस-रॉक एव्हलांच झाल्याने मोठ्या प्रमाणात बर्फ, दगड आणि मलबा ल्हेंदे खोलामध्ये कोसळला. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक प्रचंड वाढ झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.