Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

MPSC पेपरफुटीत नवा ट्विस्ट; ऋतुजा पाटीलच्या प्रियकरासोबतच्या चॅटमध्ये तब्बल '५० लाखांचा व्यवहार

MPSC पेपरफुटीत नवा ट्विस्ट; ऋतुजा पाटीलच्या प्रियकरासोबतच्या चॅटमध्ये तब्बल '५० लाखांचा व्यवहार 

पुणे : खरा पंचनामा 

औषध निरीक्षक पदाची परीक्षा होण्यापूर्वी ५० लाख रुपये भरल्याचे आरोपी ऋतुजा पाटीलकडून दावा केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिचे तिच्या प्रियकरासोबतचे नवे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्याचा दावा केला जात आहे. या चॅटमध्ये पेपरफुटीसाठी तब्बल ५० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

औषध निरीक्षक पदाची परीक्षा होण्यापूर्वी पेपर मिळवण्यासाठी ५० लाख रुपये भरल्याचे ऋतुजा पाटील हिने प्रियकरासोबतच्या संभाषणात सांगितल्याचा दावा केला जात आहे. या नव्या दाव्यामुळे पेपरफुटी प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासात ऋतुजा पाटील आणि तिच्या प्रियकरामधील चॅटिंगमधून ५ लाख रुपये दिल्याचा उल्लेख समोर आला होता. त्यामुळे पेपरफुटीसाठी पाच लाखांचा व्यवहार झाल्याचे तपासात समोर येत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता समोर आलेल्या नव्या कथित व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पेपर मिळवण्यासाठी ५० लाख रुपये भरल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आधी समोर आलेल्या पाच लाखांच्या व्यवहारापेक्षा हा दावा तब्बल दहा पट मोठा आहे.

ऋतुजा पाटीलच्या कथित चॅटमध्ये ५० लाखांचा उल्लेख असल्याने या पैशांचा नेमका व्यवहार कोणासोबत झाला, पैसे कोणाला देण्यात आले आणि पेपरफुटीच्या या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हे तपासातील महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तसेच ५ लाखांचा आधीचा उल्लेख आणि आता समोर आलेले ५० लाखांचे कथित संभाषण यामध्ये नेमका संबंध काय? याचाही तपास होणे गरजेचे आहे.

दरम्यान, समोर आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमधील दाव्यांची तपास यंत्रणांकडून पडताळणी होणे महत्त्वाचे आहे. केवळ चॅटमधील संभाषणावरून ५० लाखांचा प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार झाला, असे निष्कर्ष काढता येणार नाहीत. बँक व्यवहार, रोख पैशांची देवाणघेवाण, फोन रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे या दाव्यांची सत्यता तपासली जाईल. जर ५० लाखांच्या व्यवहाराचा दावा तपासात सिद्ध झाला, तर राज्य सेवा आयोग औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे समोर येऊ शकते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.