Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक 

मुंबई : खरा पंचनामा 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी (ता. २७) जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक केली. दगड खाणीच्या स्वामित्व धनासोबत जीएसटी रक्कम माफ करण्याच्या मोबदल्यात आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदार व्यावसायिकाकडे दीड कोटींची लाच मागितली होती. तडजोडीअंती ४० लाख रुपये घेताना त्यांना अटक केल्याचे सीबीआय प्रवक्त्याने सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विनयकुमार कंथेटी, अधीक्षक राकेशकुमार सिन्हा आणि नरिंदर राजपूत अशी अटक आरोपींची नावे आहेत. विनयकुमार आणि राजेशकुमार रायगड जिल्ह्यात नियुक्त होते. अटकेनंतर तिघांच्या कार्यालय, निवासस्थानी छापा टाकण्यात आला. त्यात ४३ लाखांची रोकड आणि सुमारे ९० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. तक्रारदाराकडे दीड कोटी लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती अधिकाऱ्यांनी रक्कम ४० लाख अशी निश्चित केली.

मात्र तक्रारदाराने सीबीआयकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून २७ ऑगस्टला सापळा रचला. राजपूत या व्यक्तीने अधिकाऱ्यांच्या वतीने ४० लाख रुपये घेतले. सीबीआय पथकाने त्यास ताब्यात घेतले. चौकशीत विनयकुमार, सिन्हा यांची नावे पुढे येताच त्यांनाही अटक करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.