Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सिप्लाला मोठा दणका, पुण्यातील औषध विक्रीचा परवाना रद्द, तुकाराम मुंढे यांची कारवाई

सिप्लाला मोठा दणका, पुण्यातील औषध विक्रीचा परवाना रद्द, तुकाराम मुंढे यांची कारवाई

मुंबई : खरा पंचनामा 

अन्न आणि औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्यामार्फत औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कायदेशीर वितरण सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने तपासणी व कठोर अंमलबजावणीची कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने 'सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेड' वडकी, पुणे येथील कॅरी अँड फॉरवर्डिंग औषध विक्री परवान्यांबाबत मोठी कारवाई करण्यात आली असून, सदर औषध विक्री परवाने दि. २७ ऑगस्ट २०२६ पासून रद्द करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने जून २०२६ च्या सुमारास वडकी, जिल्हा पुणे येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेडच्या मुख्य गोदामावर कारवाई केली होती. सदर कारवाई दरम्यान रेक्टिन प्लस टॅबलेट ह्या शेड्यूल एच औषधाच्या पॅकेजिंगवर अनालजेसिक व अटीपायरेटीक हा परवानगी नसलेला मजकूर जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले, अशा प्रकारची जाहिरात औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० व नियम १९४५ मधील तरतुदींशी विसंगत असल्याचे निदर्शनास आल्याने ११. १९ लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला होता.

अश्या प्रकारच्या जाहिरातीमुळे नागरिकांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेण्याची अर्थात सेल्फ-Medication ची प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असून, त्यातून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या कारणास्तव सदर संस्थेस Misbranded औषध Reactin Plus Tablets चा साठा बाजारातून परत मागविण्याबाबत प्रशासनामार्फत आदेश निर्गमित करण्यात आले होते, परंतु संस्थेने त्यासंदर्भात आवश्यक उपयोजना व निर्देशांचे पूर्ण पालन केले नसल्याचे निदर्शनास आले.

सदर प्रकरणाच्या अनुषंगाने तसेच संबंधित संस्थेच्या परवाने मंजूर असलेल्या CFA संस्थेची औषध विक्री व वितरण व्यवस्थेची पडताळणी करण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत त्रूटी आढळून आल्या.

१. औषधांच्या साठवणुकीसंबंधी व्यवस्थेतील तुटी,
२. खरेदी-विक्री अभिलेख, संगणकीकृत व प्रत्यक्ष साठ्यातील तफावत.
३. औषधांच्या Recall संदर्भातील निर्देशांचे अनुपालन न करणे,
४. औषधांच्या प्रत्यक्ष साठ्यात व संगणकीकृत अभिलेखांमध्ये तफावत
५. औषधांचा साठा जमिनीवर ठेवलेला आवळला
६. औषध साठवणुकीसाठी आवश्यक Pallet/Park ची अपुरी व्यवस्था
७. मुदतबाह्य औषधांच्या व्यवस्थापनासंबंधी अभिलेख व प्रक्रिया जतनाबाबत तुटी

वरील गंभीर बाबींच्या अनुषंगाने संबंधित परवानाधारकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संस्थेच्या स्पष्टीकरण अहवालात तपासणीदरम्यान आवळलेल्या त्रुटी, रेक्टिन प्लस टॅबलेटच्या बाजारातून साठा परत घेण्याच्या संदर्भातील निर्देश व इतर तरतुदींचे अपेक्षित पालन झाले नसल्याचे निदर्शनास आल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० व औषधे नियम, १९४५ मधील संबंधित तरतुदींनुसार, सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेड, वडकी, पुणे यांचे औषध विक्री परवाने दि. २७ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.