सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, अखेर 589 दिवसांनी आरोपीने सगळं सांगितल
मुंबई : खरा पंचनामा
बॉलिवुडचा नवाब खान सैफ अली खानवर गेल्या वर्षी जानेवारी 2025 ला एका अज्ञात आरोपीने घरात घूसून हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेत सैफ अली खान अक्षरशा रक्तबंबाळ झाला होता आणि त्याला रुग्णालयात अॅडमीट केलं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपीला अटक केली होती. या अटकेनंतर आरोपी जेलमध्ये होता. पण आता या प्रकरणात त्याने पोलिसांना मोठी माहिती दिली आहे.
खरं तर 16 जानेवारी 2025 ला आरोपी शरीफुल इस्लाम शेख हा तैमुरच्या रुमच्या बाथरूममधून आत शिरला आणि त्याने सैफवर चाकूने हल्ला केला होता. या घटनेनंतर सैफला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच यानंतर पोलिसांनी घटनेचा कसून तपास करत आरोपी शरीफुल इस्लाम शेख अटक केली होती.
या घटनेता आता जवळपास 589 दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरीफुल इस्लाम शेख याने आपला गुन्हा कबूल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शरीफुल इस्लाम शेख याने न्यायालयात अर्ज दाखल करत, आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण केलेला गुन्हा कबूल करण्याची तयारी असल्याचे त्याने अर्जात नमूद केले आहे. आपल्याला या प्रकरणात कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंतीही आरोपीने न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.