Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अॅक्सिस बँकेच्या निलंबित महिला कर्मचाऱ्याला अटक; जाणून घ्या, फसवणुकीचा नवा फंडा

अॅक्सिस बँकेच्या निलंबित महिला कर्मचाऱ्याला अटक; जाणून घ्या, फसवणुकीचा नवा फंडा

मुंबई : खरा पंचनामा 

भारतीय लष्कराच्या जबलपूरस्थित आर्मी व्हेईकल निगम लिमिटेडला (AVNL) वाहने भाड्याने देण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीची 32.63 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका महिलेला अटक केली आहे. मोनाली कुमारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पूर्वी अॅक्सिस बँकेच्या जबलपूर शाखेत काम करत होती, परंतु फसवणुकीच्या तक्रारी आल्यानंतर तिला बँकेतून निलंबित करण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनाली कुमारीने तक्रारदार अजित सिंग यांना व्हॉट्सअॅपद्वारे एक बनावट जाहिरात पाठवली, ज्यात AVNL कार्यालयात वाहनाची गरज असल्याचा दावा केला होता. त्यानंतर तिने अजित सिंग यांना आश्वासन दिले की ती लष्कराला त्यांची वाहने भाड्याने देऊ शकते. त्याच्या फसवणुकीला बळी पडून, अजित सिंगने जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान विविध हप्त्यांमध्ये आरोपीच्या बँक खात्यात एकूण 32 लाख 63 हजार रुपये ट्रान्स्फर केले.

बऱ्याच कालावधीनंतरही त्याची वाहने भाड्याने दिली गेली नाहीत आणि आरोपीने पैसे परत केले नाहीत, तेव्हा अजित सिंगच्या लक्षात आले की त्याची फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तपासादरम्यान, पोलिसांनी बँक खात्याची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीची ओळख आणि भूमिकेची पुष्टी केली. त्यानंतर, पोलीस पथकाने 18 ऑगस्ट रोजी जबलपूरमध्ये कारवाई करून मोनाली कुमारीला अटक केली. तपासात असेही समोर आले की, मोनाली कुमारीवर जबलपूरमध्ये विविध मार्गांनी लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल होते. या तक्रारींनंतर, अॅक्सिस बँकेने तिला निलंबित केले होते. दिंडोशी पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यातील फसवणुकीच्या रकमेपैकी 22 लाख 64 हजार 524 रुपये गोठवले आहेत. पोलिसांनी फसवणुकीसाठी वापरलेला मोबाईल फोन आणि सिम कार्डही जप्त केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.