Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

IAS ज्ञानेंद्र कुमार बेपत्ता; बेंगळुरू विमानतळावर मोबाईल बंद, दिल्लीतून अधिकारी गायब

IAS ज्ञानेंद्र कुमार बेपत्ता; बेंगळुरू विमानतळावर मोबाईल बंद, दिल्लीतून अधिकारी गायब

बेंगळूरू : खरा पंचनामा 

कर्नाटक केडरचे २०१६ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार हे बेंगळुरूमध्ये बेपत्ता झालेत. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचा मोबाईल फोन बंद झाला होता. आयएएस अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ते त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांच्या हालचालींचा मागोवा बेंगळुरू विमानतळापर्यंत घेण्यात आला आहे. ते कोठे गेले होते आणि सध्या कोठे वास्तव्यास आहेत, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून प्रवासाच्या नोंदी आणि उपलब्ध असलेल्या इतर माहितीची तपास केला जातोय. ताज्या माहितीनुसार, त्यांनी बेंगळुरू ते दिल्ली असा प्रवास केला आहे; मात्र, तेथे त्यांचे नेमके ठिकाण शोधण्यात किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यात अद्याप अधिकाऱ्यांना त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले नाहीये.

यानंतर आयएएस अधिकारी स्वेच्छेने दिल्लीला गेला होते का? अधिकारी कुठून संपर्क क्षेत्राबाहेर गेल्या याची पडताळणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. दरम्यान महत्त्वाची बाब म्हणजे, त्याच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी आतापर्यंत त्याच्या बेपत्ता झाल्याबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाहीये.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती सरकारला आहे. कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनीही माहिती दिलीय. याबाबतची अधिकची माहिती देताना खर्गे म्हणाले की, संबंधित अधिकाऱ्याच्या ठिकाणाबाबतची माहिती अधिकारी पडताळत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून बेपत्ता झाल्याची कोणतीही अधिकृत तक्रार मिळालेली नाहीये. सध्या तो अधिकारी नेमका कुठे आहे, याची माहिती सरकारकडे नसल्याचेही खर्गेनी सांगितलं.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पोहोचले होते. तेच त्यांचे लोकेशन शेवटचे होते. तेथून गंगवार यांचा मोबाईल फोन बंद करण्यात आला होता. त्यांनी बेंगळुरूहून दिल्लीकडे प्रवास केला होता का, याची पडताळणी पोलिसांनी सुरुवातीला सुरू केली होती.

त्यानंतर त्यांच्या प्रवासाच्या नोंदींची तपासणी केली असता, त्यांनी दिल्लीचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. तरीही, तपासादरम्यान दिल्लीतील ते नेमके कोणत्या ठिकाणी आहेत, ते अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे, विमानतळावर आगमन झाल्यानंतरच्या घटनाक्रम निश्चित करण्यासाठी अधिकारी प्रवासाचे तपशील आणि इतर माहितीची तपासणी करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.