Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

MPSC चा पेपर लीक करणारा गुजरातला पळाला; तरुणीने राहुल गांधींसमोर मांडली व्यथा

MPSC चा पेपर लीक करणारा गुजरातला पळाला; तरुणीने राहुल गांधींसमोर मांडली व्यथा 

पुणे : खरा पंचनामा 

राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि युवतींनी त्यांच्या अनेक समस्या मांडल्या, तक्रारी सांगितल्या तसेच महिलांना समान हक्कापासून कसे वंचित ठेवले जाते, हे देखील सांगितले.

यात एका मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) पेपर लीक झाल्याचे सांगून राहुल गांधी यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी पेपरलीक प्रकरणातील संशयित गुजरातला पळून गेल्याचेही सांगितले. ही तक्रार शरयू चोपडे या फार्मासिस्ट युवतीने राहुल गांधी यांच्यासमोर व्यासपीठावर मांडली आणि उपस्थित हजारो तरुणींकडून त्याला तेवढाच जोरदार प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) यंदा 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक (गट-ब, अन्न आणि औषध प्रशासन) पदासाठी परीक्षा घेतली. मात्र, परीक्षेचा पेपर परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे 20 मार्च रोजी लीक झाला होता. याबाबत विद्यार्थ्यांनी आरोप केल्यानंतर MPSC ने पेपर लीक झाल्याचा इन्कार केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी शिवाय त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि इतर काही मंडळींची भेट घेतल्यानंतर MPSC ने पेपरलीकबाबत गंभीर भूमिका घेतली. विशेष म्हणजे हे प्रकरण आता सीआयडीकडे आहे, अशी माहिती या प्रकरणी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करणाऱ्या शरयू चोपडे या युवतीने जाहीर व्यासपीठावर दिली.

गंभीर बाब म्हणजे MPSC पेपरलीक प्रकरणातील आरोपी गुजरातमध्ये फरार झाला आहे, अशी धक्कादायक माहिती शरयू चोपडे हिने राहुल गांधी यांना सांगितल्यावर सर्वांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या. आता या प्रकरणी आम्हाला न्याय हवा, या स्पर्धात्मक परीक्षा व्यवस्थित व्हाव्यात आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता हवी, अशी मागणी शरयूने केली. पुणे MPSC परीक्षेचे हब आहे. राज्यभरातील तरुणी आणि तरुण परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. मात्र, पेपरलीक झाल्यामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे, त्यांना नैराष्य आले आहे, याकडे तिने लक्ष वेधले. यावेळी राहुल गांधी यांनीही आपण विद्यार्थ्यांसोबत असल्याची ग्वाही दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.