Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुणरत्न सदावर्तेंना दणका; अखेर गुन्हा दाखल, जरांगे पाटलांबद्दलच ते वक्तव्य भोवलं

गुणरत्न सदावर्तेंना दणका; अखेर गुन्हा दाखल, जरांगे पाटलांबद्दलच ते वक्तव्य भोवलं

बीड : खरा पंचनामा 

मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास घुले हत्याप्रकरणाच्या संदर्भात बीडमध्ये शनिवारी विराट मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चामध्ये भाषणादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या भाषणातून धमकीवजा इशारा दिल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे, आता या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास घुले हत्याप्रकरणाच्या संदर्भात बीडमध्ये शनिवारी विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाषणादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, त्यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान या मोर्चामध्ये बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून व्हायरस पसरवण्याचे काम सुरू आहे. यांना ओबीसी नेता महसूलमंत्री म्हणून नको आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा वारंवार अपमान केला जात आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किती रोल आहे, हे माहिती नाही. परंतु जर आता मनोज जरांगे यांनी यापुढे चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपमान केला तर आम्ही देखील एकनाथ शिंदे यांचा अपमान करू, असा इशाराही यावेळी सदावर्ते यांनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.