Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"शरद पवारांनी आसरा दिल्यानेच..."; एकनाथ खडसे भावूक, भरकार्यक्रमात सगळे सांगितले

"शरद पवारांनी आसरा दिल्यानेच..."; एकनाथ खडसे भावूक, भरकार्यक्रमात सगळे सांगितले

जळगाव : खरा पंचनामा 

जनतेने मला अनेक वर्ष प्रेम दिले. 1990 साली जयंतराव पाटील, रामदास आठवले, वळसे पाटील यांच्याही संबंध आला. विरोधी पक्षात राहून सुद्धा मला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने मला मदत केली.

मागच्या काळात विरोधी पक्ष एकमेकांना मदत करायचे मात्र व्यक्तिगत मतभेद तेव्हा नव्हते. अनेक वर्ष मी भाजपच काम केले. मात्र, राजकारणामध्ये काही चढउतार आले. शरद पवार यांनी मला आसरा दिला. मला काही दिवस मागच्या काळात ब्रेक दिला. मात्र, शरद पवार यांनी मला उजेडात आणले, असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

माजी मंत्री एकनाथ खडसेंचे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, माजी मंत्री अरुणाभाई गुजराथी, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, राजकीय प्रवासात अनेक मित्र जोडले. मला राजकारणात प्रमोद महाजन यांनी प्रमोट केले. मुंडे, महाजनांचे राजकारण वेगळे होते. त्यांनी महाराष्ट्रात पक्ष रुजवला. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे, नाथाभाऊ यांची मैत्री महाराष्ट्राला माहीत आहे. 2000 ते 2014 पर्यंत भाजपचे सरकार नव्हते, मात्र कार्यक्रमांचा पाया भक्कम होता म्हणून हे भाजपला दिवस आले. प्रमोद महाजन यांनी मला बळकटी दिले. आताच राजकारण पाहून मला वेदना होतात.

"महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून केले. तापी खोरे महामंडळ, गोदावरी खोरे महामंडळ, कृष्णा खोरे महामंडळ उभे केले. यामुळे जलसिंचनाची कामे पार पडली. एवढे काम केले, पण व्यक्तिगत मतभेद ठेवले नाहीत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, त्याचा अनुभव तुम्ही घेत आहात. एवढी वर्षे सामाजिक स्वास्थ्य कधी बिघडू दिले नाही. मुक्ताईनगर नामकरण करण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले. मंदिराचा पैसा अडवण्याचे पाप मी कधीच केले नाही, गेल्या सात वर्षात मुक्ताई मंदिरासाठी निधी मिळालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.