Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

यंदाच्या गणेशोत्सवात केवळ चार दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी

यंदाच्या गणेशोत्सवात केवळ चार दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी

मुंबई : खरा पंचनामा 

यंदाच्या गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपक लावण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये गणेशोत्सवाचा दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस या दिवशीही परवानगी देण्यात आली आहे.

मात्र हे चारही दिवस विसर्जनाचे असल्याने मंडळांना स्थानिक कार्यक्रम घेण्यासाठी अजून एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची सूट मिळावी अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी १३ दिवसांची यादी फेब्रुवारी महिन्यात जाहीर केली होती. त्यात यंदाच्यावर्षी मुंबईत गणेशोत्सव कालावधीत चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. हा कायदा ध्वनीप्रदुषण कमी करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यात आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी हे ध्वनिक्षेपक लावता येतात.

मुंबई शहरासाठी एकूण १५ दिवसांपैकी प्रत्येक सणासाठी वेगवेगळे दिवस दिले आहेत. त्यात नवरात्री, दिवाळी, ख्रिसमस, ईद या सणांचाही समावेश आहे. त्यापैकी गणेशोत्सवासाठी चार दिवस दिले आहे. त्यात दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी १५ सप्टेंबर ऑगस्ट, पाचव्या दिवसाच्या विसर्जनासाठी १८ सप्टेंबरचा दिवस, गौरी विसर्जनासाठी १९ सप्टेंबरचा दिवस आणि अनंत चतुर्दशीसाठी २५ सप्टेंबर असे चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव कालावधीत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यासाठी दिवस जाहीर केले आहे. हे चारही दिवस विसर्जनाचे असल्याने मंडळांना स्थानिक कार्यक्रम घेण्यासाठी अजून एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची सूट मिळावी, अशी मागणी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

सवलत कधी ?
गणेशोत्सव (दुसरा दिवस) : १५ सप्टेंबर २०२६ (मंगळवार)
पाचवा दिवसः १८ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार)
गौरी विसर्जनः १९ सप्टेंबर २०२६ (शनिवार)
अनंत चतुर्दशी (विसर्जन मिरवणूक): २५ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.