Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"दिल्लीतील दोन गुजराथी आणि मुंबईतील दोन गुजराथी महाराष्ट्रावर."

"दिल्लीतील दोन गुजराथी आणि मुंबईतील दोन गुजराथी महाराष्ट्रावर."

नाशिक : खरा पंचनामा 

दिल्लीत जंतरमंतरवर झाले तसे नाशिकमध्ये जनआंदोलन होणे आवश्यक आहे. ज्या गतीने नाशकिचा विकास होणे आवश्यक होते, तसे झालेले नाही. नाशिकमध्ये असलेले प्रकल्प बाहेरजात आहेत. कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी खर्च करीत आहात. हा जनतेचा पैसा आहे. नाशिकच्या विकासाकरिता नाही तर धर्म प्रसाराकरिता हा पैसा खर्च केला जात आहे. याविरुध्द जनआंदोलन उभारले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

शुक्रवारी नाशिक येथे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जंतर मंतरवरील आंदोलनापासून नाशिकच्या कुंभमेळ्यापर्यंत सर्व विषय मांडले. "कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचे बजेट काढले आहे. कुंभमेळ्याला किती लोक येणार आहेत ? मागच्या वेळी ४० लाखाच्या आसपास लोक आले होते. आता सरकारच्या म्हणण्यानुसार यावेळी सहा कोटी लोक येतील. पण खरंच सहा कोटी लोक येतील का ? याचा कोणी अभ्यास केला आहे का ? समजा सहा कोटी लोक खरंच आले तर तेवढ्या लोकांचा भार नाशिकला पेलवणार आहे का ? आता गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झालेत, पण त्यांना नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे", अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कुंभमेळ्यातील कामांसंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल आहे काय, याविषयी मुख्य सचिवांसह आयुक्ताकंडे विचारणा करणार आहे, प्रकल्प अहवालावर जाहीरपणे चर्चा झाली पाहिजे. फक्त आकडा फुगविण्यासाठी हे करणार असाल तर कोणाला तुम्ही जबाबदार धरणार आहात?, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

"कुंभमेळ्याचे मंत्रालय करुन पालकमंत्र्यांना कुंभमेळा मंत्री केले. मंत्री ही घटनात्मक तरतूद आहे. मुख्यमंत्र्यांनी खरोखर असे नवीन खाते तयार केले आहे का, याची विचारणा करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात नवीन मंत्रालय केले का, हे कॅबिनेटमध्ये सांगावे. जेन झीच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे की जनरेट्यापुढे सरकारला नमते घ्यावे लागते. नाशिकसाठी पैसे खर्च करण्यास हरकत नाही. परंतु, फक्त टेंडर काढण्यासाठी तसे होत असले तर अयोग्य आहे. एका मोठ्या कंपनीने उपकंत्राट नेमले असल्याची माहिती आहे. कोल्हापूरच्या परिषदेत कंत्राटदारांनी सांगितले की, आम्हांला ५६ टक्के द्यावे लागतात. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट होतो. कारण नसताना कामे काढली जातात. जनतेचा पैसा आहे, त्याची उधळपट्टी करु नका ", असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

"नाशिकमध्ये पाणी, प्रदूषण असे सर्व प्रश्न आहत. नागपूरला जे झाले ते करु नका. सर्व रस्ते उखडून काँक्रिटचे करु नका. स्मार्ट सिटी योजनेने सर्व शहरे भकास केली. अव्यावहारिक सुलतानी कारभार सुरु आहे. शाहीस्नानावेळी खरोखर इतकी गर्दी झाल्यास हे शहर एवढा भार पेलू शकेल काय, गोदावरी पेलू शकेल, काय, याचे कुठेतरी परीक्षण झाले पाहिजे. आमचे १६ आमदारर आहेत. ते फोडण्यासाठीही प्रयत्न होत आहेत.. नाशिकच्या नागरिकांना आवाहन आहे. त्यांनी मतभेत विसरुन जनआंदोलन करावे. सविस्तर प्रकल्प अहवाल जनतेला सादर केला पाहिजे. मगच खर्च केला पाहिजे. कोणाला निविदा दिल्या, ते कळले पाहिजे. दोन दिल्लीतील गुजराथी माणसे आणि दोन मुंबईतील गुजराथी माणसे महाराष्ट्र काबीज करताहेत. सर्व कंत्राट तुम्ही अमित शहांना देताहेत", असा आरोपही चव्हाण यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.