आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच. आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू
बारामती : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (PA) अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याची माहिती समोर आली आहे.
बारामतीतील रुई परिसरातील साईनगर भागात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. थोड्याच वेळात आमदार रोहित पवार याठिकाणी येणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे.
हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.