Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत साडेचार कोटींची 'व्हेल माशाची उलटी' जप्तकोल्हापूर जिल्ह्यातील आरोपीला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

सांगलीत साडेचार कोटींची 'व्हेल माशाची उलटी' जप्त
कोल्हापूर जिल्ह्यातील आरोपीला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबे डिग्रज येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ कोटी ५२ लाख १० हजार रुपये किमतीची, ४ किलो ५२१ ग्रॅम वजनाची 'व्हेल माशाची उलटी' (ॲंबरग्रिस) जप्त केली आहे. या बेकायदेशीर विक्री प्रकरणी अमोल आत्माराम शिद (वय ३९, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून, मालवण येथील निखील नावाच्या संशयितावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, पोलीस अंमलदार व वनविभागाच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळ आरोपी अमोल शिद हा त्याच्या ताब्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकलवरून (क्र. MH 09 AF 7968) ॲंबरग्रिसची विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलीस अंमलदार महेश भुपाल जाधव यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ३९, ४३, ४४, ४८ आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख करत असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, अरुण औताडे, मेघराज रुपनर, सचिन खाडे, महेश जाधव, अभिजित पाटील, हिम्मत शेख, योगेश यादव, अमित पाटील तसेच वनविभागाकडील स्टाफ गणेश बबनराव भोसले, वनरक्षक, भोसे, सुधीर वसंत सोनवले, वनपाल, भोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.