Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत सीमेवरील जवानांसाठी ‘राखी पाठवणे’ व विद्यार्थी प्रबोधन सोहळा उत्साहात

मिरजेत सीमेवरील जवानांसाठी ‘राखी पाठवणे’ व विद्यार्थी प्रबोधन सोहळा उत्साहात 

पूजा फडके 
मिरज : खरा पंचनामा 

परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, मिरज आणि न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी संघटना, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आज बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे सीमेवरील जवानांसाठी ‘राखी पाठवणे’ आणि भव्य विद्यार्थी प्रबोधन व मार्गदर्शन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता मोहपात्रा (IAS) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (IPS) उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत आणि प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मुख्याध्यापक श्री. मिलिंद अग्रवाल यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विशेष मुलांच्या हस्ते जवानांसाठी राख्या व पत्र सुपूर्द:
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे विशेष मुलांनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या आणि विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी लिहिलेली कृतज्ञता पत्रे विशेष मुलांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. उद्घाटक संजीता महापात्र व अध्यक्ष तुषार दोशी यांनी आपल्या भाषणातून उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. प्रमुख वक्ते इंद्रजीत देशमुख यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना देशसेवा व सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देत प्रभावी प्रबोधन केले. कार्यक्रमास मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या यशस्वी आयोजनात परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी संघटनेच्या नियोजन समिती सदस्यांचे मोलाचे योगदान राहिले. यामध्ये प्रामुख्याने डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. विकास पाटील, डॉ. सूर्यकांत व्हावळ, डॉ. रणजित चिदगुपकर, मिलिंद अग्रवाल, आतिश अग्रवाल, बाबासाहेब आलतेकर, प्रभात हेटकाळे, अजित पोतदार, विशाल लिपाणेपाटील, संदीप पिंपाळीया, मंदीर वसगडेकर, रमेश पाटील, सुहास कोठी, प्रकाश भंडारे, सतीश माने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या विशेष नियोजनामुळे हा सोहळा शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.