जे आमदारांना जमलं नाही ते २० वर्षांच्या पोरानं केलं, एकट्यानं अख्खी नदी केली स्वच्छ
इंदोर : खरा पंचनामा
मध्य प्रदेशातील एका तरुणाने प्रदूषित झालेली नदी एकट्यानं स्वच्छ केली. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. जलप्रदूषण ही आपल्या देशातील एक मोठी समस्या आहे. अन् वाढत्या विकासासोबत ही समस्या हळूहळू वाढू लागली आहे. मोठमोठ्या कारखान्यांचं पाणी थेट नदीमध्ये सोडलं जातं. लोकं वाट्टेल तसा कचरा नद्यांमध्ये टाकतात. अन् जिथे थोडंफार स्वच्छ पाणी दिसेल, तिथे कपडे धुतात. अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत.
बरं, या नद्यांना स्वच्छ करण्यासाठी प्रशासन दरवर्षी मोठमोठे प्रकल्प जाहीर करतं. पण परिस्थिती काही फारशी सुधारलेली दिसत नाही. पण जे काम मोठमोठ्या राजकीय नेत्यांना शक्य झालं नाही किंवा उच्चशिक्षित अधिकाऱ्यांना जमलं नाही, ते काम एका सामान्य तरुणानं करून दाखवलंय. त्यानं एकट्यानं प्रदूषित झालेली नदी स्वच्छ केली. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, देशभरातील नेटकरी त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.... अन् एकट्यानं नदी केली स्वच्छ.
"ऊपरवाले के भरोसे मत बैठो, क्या पता वो तुम्हारे भरोसे बैठा हो।" ही एक प्रसिद्ध म्हण आहे. अन् तरुणानं ही म्हण शब्दशः खरी करून दाखवली. सरकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी तो स्वतः कामाला लागला. प्रदूषित नदीमध्ये उतरला आणि रोज थोडा थोडा कचरा बाहेर काढू लागला. अन् आश्चर्य म्हणजे त्यानं पाहता पाहता अख्खी नदी स्वच्छ केली. दरम्यान, गावकऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्नदेखील केला होता. काही जणांनी त्याची फिरकीदेखील घेतली. त्याच्या व्हिडीओंवर टीका केली. म्हणे, तो व्ह्यूजसाठी हे सगळं करतोय. पण तो थांबला नाही. त्यानं आपलं काम सुरूच ठेवलं. अन् आज संपूर्ण देशात त्याच्या कामाची चर्चा होतेय. लोकं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनीदेखील त्याच्यावर कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली होती. या तरुणाला पाहून काम करण्याची प्रेरणा मिळते, असं ते म्हणाले होते. असो, या तरुणानं नदी स्वच्छ कशी केली, याचे काही व्हिडीओदेखील त्यानं आपल्या bittu_tabahi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केले आहेत. अन् या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.