Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्हास्तरीय दांडपट्टा स्पर्धेत रुद्राक्ष अकॅडमी इचलकरंजीचा डंका; ९८ पदकांसह मिळवले उपविजेतेपद

जिल्हास्तरीय दांडपट्टा स्पर्धेत रुद्राक्ष अकॅडमी इचलकरंजीचा डंका; ९८ पदकांसह मिळवले उपविजेतेपद

पूजा फडके 
इचलकरंजी : खरा पंचनामा 

दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर यांच्या वतीने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या जिल्हास्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत इचलकरंजी येथील रुद्राक्ष अकॅडमीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत तब्बल ९८ पदकांची लयलूट केली आणि संपूर्ण जिल्ह्यात दुसरा क्रमांक (उपविजेतेपद) पटकावला.

या अजिंक्यपद स्पर्धेत रुद्राक्ष अकॅडमीच्या स्पर्धकांनी हस्तलम, कर्तलम, मुक्तशैली, समूह आणि द्वंद्व युद्ध या सर्वच मर्दानी खेळ प्रकारांमध्ये आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले. खेळाडूंनी अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये दमदार कामगिरी करत ५९ सुवर्ण, २९ रौप्य आणि १० कांस्य पदकांसह एकूण ९८ पदकांवर आपले नाव कोरले.

या अभूतपूर्व यशामागे रुद्राक्ष अकॅडमीच्या मुख्य प्रशिक्षिका सौ. केतकी रेंदाळे शेलार यांचे मोलाचे मार्गदर्शन व खेळाडूंचे कठोर परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. महाराष्ट्राच्या पारंपरिक मर्दानी खेळाची परंपरा जोपासत मिळवलेल्या या भव्य यशाबद्दल रुद्राक्ष अकॅडमीचे, विजेत्या खेळाडूंचे व प्रशिक्षिकांचे इचलकरंजी शहरासह सर्व स्तरातून जोरदार कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.