जिल्हास्तरीय दांडपट्टा स्पर्धेत राजवीर म्हेतरचे दुहेरी यश; पटकावली दोन सुवर्णपदके
पूजा फडके
कोल्हापूर : खरा पंचनामा
जयसिंगपूर येथे पार पडलेल्या तिसऱ्या जिल्हास्तरीय सर्व दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धेत राजवीर गायत्री रणजीत म्हेतर याने दैदिप्यमान कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.
दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राजवीरने 'हस्तलम' आणि 'समूह' या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट प्राविण्य दाखवत अव्वल स्थान पटकावले. त्याला रुद्राक्ष अकॅडमीच्या प्रशिक्षिका सौ. केतकी रेंदाळ-शेलार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, या दुहेरी सुवर्ण यशाबद्दल सर्व स्तरातून राजवीरचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.