Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सावली बेघर निवारा केंद्र येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवआरती आणि मर्दानी खेळांच्या आयोजनातून सामाजिक सलोखा व निसर्ग संवर्धनाचा संदेश

सावली बेघर निवारा केंद्र येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव
आरती आणि मर्दानी खेळांच्या आयोजनातून सामाजिक सलोखा व निसर्ग संवर्धनाचा संदेश

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सावली बेघर निवारा केंद्र येथे काल मुस्तफा भाई यांच्या वतीने गणपती बाप्पाची महाआरती आणि पारंपरिक मर्दानी खेळांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संपूर्ण डेकोरेशन पर्यावरणपूरक करून, श्रींचे विसर्जन कुंडीतील झाडामध्ये करत निसर्ग संवर्धनाचा एक अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद संदेश देण्यात आला.

या विशेष सोहळ्याला सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त संचिता मोहपात्र, उपायुक्त स्मृती पाटील आणि ज्योती सरवदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी 'जगदंब मर्दानी आखाड्या'च्या ज्योती सूर्यवंशी व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या शूर आणि वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवणारे थरारक मर्दानी खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्याला  निवारा चालक मुस्तफा मुजावर व सावलीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक एकोपा, सर्वधर्मीय सलोखा आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श वस्तुपाठ घालणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.