जरांगेच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...
जालना : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सलग चौदाव्या दिवशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी दीपके यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि त्यांच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले होते. या भेटीदरम्यान, दीपके यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली.
जरांगे पाटील सध्या सलाईन घेत असले तरी, त्यांनी यापूर्वी पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला होता. डॉक्टरांनुसार त्यांची शुगर पातळी कमी झाली असण्याची शक्यता आहे. या गंभीर स्थितीतही उपोषण सुरूच असल्याने, अभिजीत दीपके यांनी "तुम्ही कितीही दिवस बसून राहा, सरकारला फरक पडणार नाही," असे मनोज जरांगेंना सांगितले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.