Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वोट चोरी म्हणजे संविधानावर थेट हल्ला; आप बचेंगें नहीं म्हणत, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाला इशारा

वोट चोरी म्हणजे संविधानावर थेट हल्ला; आप बचेंगें नहीं म्हणत, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाला इशारा

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

निवडणूक आयोगासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तावरून देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.

मतदानातील कथित अनियमिततेला त्यांनी 'वोट चोरी' असे संबोधत हा प्रकार भारतीय जनतेविरोधातील गुन्हा आणि संविधानावर थेट हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत भाजप आणि आरएसएस आणि निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. 'वोट चोरी' असे म्हणत गांधी यांनी संबंधितांवर कारवाई होईल, असा दावा केला आहे. तसेच आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, मतदानातील कथित चोरी हा भारतीय जनतेविरोधातील गुन्हा असून संविधानावर केलेला थेट हल्ला आहे.
हे ट्विट करताना राहुल गांधी यांनी त्यासोबत एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांना उद्देशून, 'तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे. वेळ येईल, आम्ही तुम्हाला पकडू, तुम्ही वाचणार नाही,' असे वक्तव्य केले. काँग्रेसनेही राहुल गांधींचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत भाजप आणि निवडणूक आयोगावर लोकशाही कमकुवत करण्याचा आरोप केला. पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसच्या दाव्यानुसार, निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत 14 वेळा तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींमध्ये महत्त्वाच्या निर्णयांबाबत पुरेशी माहिती किंवा सल्लामसलत केली जात नसल्याचा आरोप करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. SIR, मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे जोडणे किंवा वगळणे, तसेच मतदार यादीच्या सुरक्षेसह विविध मुद्द्यांचा या तक्रारींमध्ये समावेश असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

राहुल गांधी गेल्या काही काळापासून निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी यापूर्वीही 'वोट चोरी'चे आरोप करत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेले मतदार चोरीचे आरोप निवडणूक आयोगाने यापूर्वी चुकीचे आणि निराधार असल्याचे सांगत फेटाळले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यातील आरोप-प्रत्यारोप कायम असल्याचे चित्र आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.