Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तासगावमधील घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाशसोन्याचे ६.३० लाखांचे दागिने जप्त, आरोपी जेरबंद

तासगावमधील घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश
सोन्याचे  ६.३० लाखांचे दागिने जप्त, आरोपी जेरबंद

सांगली : खरा पंचनामा 

तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्या घरातून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या चोराला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ४२ ग्रॅम वजनाचे तब्बल ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईत सिद्धार्थ संजय गुरव (वय २०, रा. साळसिंगे रोड, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) याला अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याला जप्त मुद्देमालासह तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गव्हाण (ता. तासगाव) येथील रहिवासी रोहन लक्ष्मण गुरव यांच्या घरातून ऑगस्ट महिन्यात उघड्या दरवाजाचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. चोरीच्या या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व सहकाऱ्यांचे विशेष पथक तयार केले.

२ सप्टेंबर २०२६ रोजी हे पथक तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर आणि सतीश माने यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित इसम तासगाव कॉलेज ते भिलवडी बायपास रस्त्यावरील एम.एस.ई.बी. (MSEB) कार्यालयासमोर चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ परिसरात सापळा रचला. तेथे संशयास्पदरित्या थांबलेल्या सिद्धार्थ गुरव याला ताब्यात घेऊन त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात नेकलेस, चैन, मिनीगंठण, कानातील कर्णफुले आणि अंगठी असे सोन्याचे दागिने मिळून आले. पोलिसी हिसका दाखवून चौकशी केली असता त्याने गव्हाण येथील घरातून हे दागिने चोरल्याची कबुली दिली.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सपना गराडे, सागर टिंगरे, सतीश माने, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर लवटे, अमर नरळे, मोतीराम खोत, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलावडे, उदय माळी, अमीरशा फकीर, महादेव नागणे, प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण आणि चालक गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.