श्री राम जनरल इन्शुरन्स कंपनी, मुसा शेख यांच्यावर फसवणुकीची तक्रार दाखल
सांगली : खरा पंचनामा
अंकुश काशीनाथ पवार रा. जयसिंगपूर (ता. शिरोळ) यांनी सांगलीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दिलेल्या अर्जानुसार श्रीराम फायनान्सकडील इन्शुरन्स पाहणारे श्री. शेख यांनी त्यांची फसवणूक केली आहे.
पवार यांनी सन २०१० मध्ये सांगली येथील श्रीराम फायनान्स कंपनीकडून कर्ज प्रकरण करून (एम.एच. ०९-क्यु ६२५५) क्रमांकाचे वाहन खरेदी केले होते. शेख यांनी वाहनावर श्रीराम जनरल इन्शुरन्स उतरवून देतो असे सांगून पैसे व फी घेतली व ३१ मार्च २०१६ रोजी पॉलिसी उतरवून दिली. दरम्यानच्या काळात वाहनाचा सांगली येथे अपघात झाला व नंतर न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल झाला. यात मुसा जिजानी शेख आणि श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी खोटी इन्शुरन्स उतरवून खोटी विमा पावती दिल्याचे स्पष्ट झाले. तसेच जखमी अमर हिराचंद मोहनानी यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश झाल्यानंतर कंपनीकडे चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली.
मुसा या प्रकरणी जिजानी शेख व श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी संगनमत करून फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.