ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी घेणार आहे.
ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीशिवाय भारतीय निवडणूक आयोगाच्या नावाने अनेक निर्णय घेतले, असा आरोप या याचिकेत केला आहे. मंगळवारी ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. यानंतर सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात घेणार असल्याचे सांगितले.
बार अँड बेंचच्या अहवालानुसार, निवडणूक आयोगामध्ये सत्तेचे केंद्रीकरण वाढत आहे, म्हणजेच एकच व्यक्ती निर्णय घेत आहे. निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले जावेत कायदा हे सांगतो. आता, ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने काम केले आहे, ते पाहता विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेतला होता की नाही, याबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे, असा आरोप या याचिकेत केला आहे. जर आयोगाने एकमताने निर्णय घेतला नसेल, तर न्यायालयाचा निर्णय हा आयोगाचा निर्णय आहे या वस्तुस्थितीवर आधारित होता.
निवडणूक आयोग ही एक बहुसदस्यीय संस्था आहे. सध्या ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी हे निवडणूक आयुक्त आहेत. कायद्यानुसार, कोणत्याही मुद्द्यावर तिघांमध्ये मतभेद झाल्यास, बहुमताने निर्णय घेणे बंधनकारक आहे, असेही या याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेत SIR वरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जर आयोगाने संपूर्ण प्रक्रियेवर एकमताने निर्णय घेतला नसेल, तर त्यामुळे गंभीर घटनात्मक प्रश्न निर्माण होतात, असे सवालही उपस्थित केले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.