Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता; अध्यक्षांना मात्र यापासून..

MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता; अध्यक्षांना मात्र यापासून..

मुंबई : खरा पंचनामा 

स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी थांबवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अपर आयुक्त व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. तसेच स्थापन करून परीक्षा पद्धतीतील गैरप्रकारचा तपास केला जाणार आहे. या कमिटीच्या मदतीने काही जणांना अटकही करण्यात आलेली आहे. मात्र यानंतर आयोगातील दोन सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आणखी चार आरोपींना अटक केली आहे. विशेष तपास पथकाने कारवाई करत दोन मध्यस्थ आणि दोन उमेदवारांना बेड्या ठोकल्या आहेत. या नव्या अटकेमुळे एमपीएससीच्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेला नवीन वळण आले आहे. या प्रकरणामुळे आयोगातील हा घोटाळा एखाद्या विद्यार्थ्यापुरता किंवा जिल्हा पुरता मर्यादित नसून राज्यभर पसरल्याचे सिद्ध झाले. संयुक्त २०२५ च्या मुख्य परीक्षा दिलेले उमेदवारही अटक झाली आहे. त्यानंतर आता आयोगातील काहींची चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.

एमपीएससीच्या संपूर्ण रचनेमध्ये सदस्यांची भूमिका अंतिम महत्त्वाची असते. विविध मुलाखतीच्या पॅनलमध्ये सदस्य हे अध्यक्ष असतात. तसेच आयोगाच्या विविध निर्णय प्रक्रियांमध्ये हे त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे परीक्षेतील गोंधळानंतर आता सदस्यांच्या भूमिकेवरही संशय उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने घटित केलेल्या एसआयटी समिती समोर आयोगातील दोन सदस्यांचे चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.