Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अभिजीत दिपके प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव ?

अभिजीत दिपके प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव ?

पुणे : खरा पंचनामा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संथ कारभाराविरुद्ध राज्यातील परीक्षार्थीचा उद्रेक झाला असून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सीबीडी बेलापूर अशा मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत.

काही राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अशातच आता एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने आत्महत्या केली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी या लढ्यात उडी घेत राज्य सरकारला तीव्र निदर्शनांचा इशारा दिला आहे.

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्याः
पदसंख्येत वाढः विविध स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातींमध्ये रिक्त जागा अत्यंत कमी असल्याने पदसंख्या तत्काळ वाढवण्यात यावी.
निकालाचा मार्ग मोकळा कराः परीक्षा होऊन महिने उलटले तरी रखडलेले निकाल, रखडलेल्या मुलाखती आणि प्रलंबित नियुक्त्यांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी.
नियोजनात सुधारणाः वेळापत्रकातील सततचे बदल, उत्तरतालिकेतील चुका आणि पेपर फुटीचे प्रकार थांबवून परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणावी.

एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने पुण्याच्या नवी पेठ भागातील भाड्याच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच भडकला. अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, ते लवकरच प्रथमेशच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करतील. यावरून त्यांनी सरकारला कडक इशारा देखील दिला आहे.

त्याचवेळी सीजेपीचे ज्येष्ठ नेते सौरभ दास नोएडामध्ये प्रशासकीय कारवाईचा सामना करणाऱ्या अक्षत नावाच्या विद्यार्थ्याला भेटणार आहेत. प्रशासनाने अक्षतवर 5 लाख रुपयांची नोटीस बजावली आहे. MPSC आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन उभे करू, असा स्पष्ट इशारा दिपके यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.