बनावट ST प्रमाणपत्रावर ३० वर्षे नोकरी, तरीही मिळणार पेन्शन; सुप्रीम कोर्टाचा मुंबईतील इंजिनिअरला दिलासा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सर्वोच्च न्यायालयाने बनावट अनुसूचित जनजाती (एसटी) प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्याला दिलासा दिला आहे. बृहन्मुंबई नगर निगम (एमसीजीएम) ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर म्हणून नोकरी मिळवल्यानंतर तब्बल ३० वर्षे नोकरी केली.
जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आल्यानंतर जवळपास १० वर्षांहून अधिक काळ कर्मचाऱ्याने अपात्रता टाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्याला बडतर्फ न करता स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे आदेश दिले. स्वेच्छानिवृत्तीनंतर नियमानुसार पेन्शन देण्यास परवानगी देण्यात आलीय.
शिरीष पाटील असं इंजिनिअरचं नाव असून त्याचं प्रमाणपत्र जात पडताळणी समिती आणि उच्च न्यायालयाने अवैध ठरवलं होतं. तरीही सर्वोच्च न्यायालयाने शिरीष पाटीलला सेवानिवृत्तीच्या लाभासह निवृत्तीची परवानगी दिलीय. शिरीष पाटीलने १९८४मध्ये टोकरे कोली जातीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं. या कागदपत्राच्या आधारे १९९४मध्ये एमसीजीएममध्ये ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअरच्या पदावर शिरीष पाटीलची निवड झाली होती. दरम्यान, मूळ प्रमाणपत्र हरवल्याचा दावा केला आणि २०० मध्ये भुसावळच्या उपविभागीय मॅजिस्ट्रेटकडून नवं प्रमाणपत्र बनवून घेतलं.
एमसीजीएममध्ये करण्यात आलेल्या चौकशीत शिरीष पाटीलचे पूर्वज कोळी, हिंदू कोळी आणि हिंदू सूर्यवंशी कोळी होते. याचा समावेश एसटीमध्ये येत नाही. जुलै २००९मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र शिरीक्ष पाटीलने वकील आणि कुटुंबियांच्या अनुपलब्धतेचं कारण देत जानेवारी २०२०पर्यंत कारवाई टाळली. शेवटी २०२०मध्ये जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र अवैध ठरवत रद्द केलं. हायकोर्टानेही यावर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, इंजिनिअर शिरीष पाटीलने ३० जून २०२५पर्यंत नोकरी केली. एसटी प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून तब्बल ३० वर्ष नोकरीही केली. प्रमाणपत्र अवैध ठरल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची पार्श्वभूमी आणि सेवेचा कालावधी पाहून शिरीष पाटीलला बडतर्फ न करता सर्व पेन्शन आणि सेवानिवृत्तीच्या लाभासह स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे आदेश दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.