प्रयागराज : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नवाबगंज येथील बरईपूर रामगनगर गावात राजेश यादव ऊर्फ बबलू आणि त्याचा भाऊ राकेश यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांकडून करोडो रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
त्याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधीची अचल संपत्ती सापडली आहे. यात जमीन आणि घरांचा समावेश आहे. या दोघांची संपत्ती 80 कोटी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या दोघांकडे एवढी संपत्ती आली कुठून? याचं गूढ पोलीस आणि आयकर विभागाला पडलं असून त्याचा तपास सुरू आहे.
प्रयागराजच्या बरईपूर रामनगर गावात राजेश यादव याच्या घरात खोदल्यानंतर जमिनीखाली तीन निळे ड्रम सापडले. या तिन्ही ड्रममध्ये 500 रुपयांच्या नोटांच्या गड्ड्या होत्या. बुधावारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. म्हणजे 28-29
ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना एक तक्रार मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राजेश यादव आणि राकेश यादव ऊर्फ महाकालच्या घरात खोदकाम सुरू केलं.
यावेळी जमिनीखाली तीन ड्रम गाडलेले आढळले. या तिन्ही ड्रममध्ये नोटा खच्चून भरल्या होत्या. या सर्व नोटा 500 रुपयांच्या होत्या. कपड्यांमध्ये गुंडाळून या नोटा ठेवल्या होत्या. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नोटा मोजण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही रक्कम 5 कोटी असल्याचं सांगितलं गेलं. पण स्थानिकांच्या अंदाजनुसार सुमारे 60 कोटी रुपये या ड्रममध्ये सापडले आहेत.
एवढं मोठं घबाड सापडल्यानंतर आयकर विभागने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. राजेश आणि राकेश यांची एकूण संपत्ती किती? याचा तपास सुरू केला असता सर्वच थक्क झाले. राजेश यादवने गेल्या तीन वर्षात खासकरून 2024 नंतर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावे 48 जमिनी घेतल्या आहेत. त्याच्याकडे 22 एकर जमीन आणि सुमारे 20 कोटी रुपयांची अचल संपत्ती असल्याचं उघड झालं आहे.
राजेश यादवने जमीन खरेदी केल्यानंतर दोन मजली मार्केट बांधलं होतं. या मार्केटमध्ये एकूण 15 दुकाने आहेत. दीड कोटी रुपयात खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवर हे मार्केट बांधलं आहे. त्याची दादनपूर, मुबारकपूर, मेंडारा, शांतीपुरम आदी गावातही जमीन आहे. त्याने गेल्या काही महिन्यांपूर्वी गाड्या आणि डीजे बँडही खरेदी केला होता. पोलीस आणि आयकर विभाग त्याच्या संपूर्ण संपत्तीचा तपास करत आहे. राजेश आणि राकेश या दोघांची एकूण संपत्ती किती आणि त्याचे मार्केट मूल्य काय आहे? याचा तपास केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
