मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली भागवतांची भेट; चर्चांना उधाण
नागपूर : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मात्र या चर्चेचा विषय गुलदस्त्यात आहे. या भेटीवरून अनेक तर्क लावले जात आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगातील मतभेद, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, सरकारविरोधात कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेसने घेतलेली आक्रमक भूमिका या विषयांसह इतर मुद्दय़ांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहन भागवत यांच्यासोबत या भेटीमध्ये चर्चा केल्याचेही सांगितले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासंदर्भातही उभय नेत्यांमध्ये बोलणे झाले असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.