Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमली पदार्थ विकताना मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील हवालदाराला अटक, १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थ विकताना मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील हवालदाराला अटक, १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

भाईंदर : खरा पंचनामा 

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी मिरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयातील एका हवालदाराला त्याच्या साथीदारासह शुक्रवारी अटक करण्यात आली. भाईंदर पूर्वेतील गोल्डन नेस्ट परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रकाश पवार असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव असून, तो पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे. पवार अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने गोल्डन नेस्ट येथील हनुमान मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी पवार आणि त्याचा साथीदार अखिलेश कुमार (रा. जोगेश्वरी) यांना ताब्यात घेण्यात आले.

पवारकडे ९.२ ग्रॅम एमडी आणि दहा हजार रुपयांची रोकड आढळली. दोघांविरोधात नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार अमली पदार्थ कुठून आणत होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. यापूर्वी नयानगर पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने शेतात अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.