जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपचे नाशिक कनेक्शन? विरोधात बैठक घेणारे नेते कोण?
नाशिक : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. या ऑडिओ क्लिप वरील आरोपांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेषतः महायुतीमध्येच मोठा वाद उफाळून आला आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी पडद्यामागून सूत्रे हलविण्यात आली. त्यात दिल्लीतील भाजप नेत्यांकडून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 500 कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्याने मोठी खळबळ उडाली.
दसऱ्याच्या मुहूर्तावर या आरोपाने नव्या राजकीय वादाला तोंड फोडले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवर गंभीर आरोप केले. त्याला भाजप नेत्यांनी त्याच तीव्रतेने उत्तर दिले होते. विरोधी पक्षांनाही या निमित्ताने एक नवे शस्त्र मिळाले. सत्ताधारी भाजपचे नेते त्या आरोपांनी गोंधळले होते. याबाबत महायुतीत समेट झाला आहे. परस्परांवर आरोप प्रत्यारोप न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता ऑडिओ क्लिप आणि त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप याचे नाशिक कनेक्शन चर्चेत आले आहे. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केले.
नाशिकचे कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत, अशी घोषणा सतत इलेक्ट्रॉनिक मीडियात चर्चेत राहणाऱ्या व महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजप प्रवेश केलेल्या या वादग्रस्त नेत्यांनी केली होती. जरांगे पाटील यांच्यावर आरोप करून आंदोलनाला वेगळी दिशा देणाऱ्या य नेत्याला ऑडिओ क्लिप मधील चर्चेनुसार लाभ तर मिळाला नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
समाज माध्यमांवर या नेत्याने केलेल्या घोटाळ्यांचे आणि त्याच्यावर दाखल गुन्ह्यांच्या पोस्ट देखील जरांगे समर्थकांनी व्हायरल केल्या होत्या. ऑडिओ क्लिपचे राजकारण चर्चेत आल्याने नाशिक मधील ती बैठक आणि त्या नेत्याचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.