Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

१६ महिन्यांत ३६ जणांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली, न्यायाधीश रवी कुमार दिवाकर कोण आहेत?

१६ महिन्यांत ३६ जणांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली, न्यायाधीश रवी कुमार दिवाकर कोण आहेत?

लखनऊ : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे चांगलेच चर्चेत आहेत. न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे मुझफ्फरनगर येथील फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायाधीश होते. मात्र, आता न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची कौटुंबिक न्यायालयात बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी १६ महिन्यांत ३६ जणांना फाशीची शिक्षा सुनावणी आहे. त्यामुळे ते चर्चेत आलेले आहेत.

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मुझफ्फरनगरमध्ये ११ प्रकरणांमध्ये २३ जणांना आणि बरेलीमध्ये १३ जणांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे चर्चेत आले. त्यानंतर आता न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची फास्ट ट्रॅक कोर्टामधून कुटुंब न्यायालयात (फॅमिली कोर्ट) बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, आता न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे मुझफ्फरनगरमधील कुटुंब न्यायालयात पदभार स्वीकारतील. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची मुझफ्फरनगरला २९ नोव्हेंबर २०२५ रोजी नियुक्ती झाली होती. 'फास्ट ट्रॅक कोर्ट-३'चे पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी मुझफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांतील फौजदारी खटल्यांची सुनावणी केली होती. तसेच ७सप्टेंबर रोजी एका प्रकरणात एका व्यक्तीला दोषी ठरवत मुझफ्फरनगर न्यायालयात २३ वी फाशीची शिक्षा त्यांनी सुनावली होती.

दरम्यान, न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांचा कार्यकाळ चर्चेत आला, तेव्हा त्यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेले खुनासह इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित किमान ९७ खटले परत मागवून घेण्यात आले होते. मात्र, यावर न्यायाधीश दिवाकर यांनी खटले परत मागवून घेण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दरम्यान, एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ या काळात न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी वाराणसी येथे दिवाणी न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यांची बदली बरेली येथे झाली होती. तेथे ते अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (फास्ट ट्रॅक कोर्ट) बनले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांची मुझफ्फरनगर येथे बदली झाली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.