Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतचोरीविरोधात इंडिया आघाडीची उद्या रामलीला मैदानावर महारॅली

मतचोरीविरोधात इंडिया आघाडीची उद्या रामलीला मैदानावर महारॅली

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी 'इंडिया' आघाडीने निर्णायक लढा पुकारला आहे. भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतचोरीविरोधात रविवार, 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत महामार्च आणि रामलीला मैदानावर महारॅली होणार असून देशभरातून लाखोंचा जनसागर धडकणार आहे.

दिल्लीत पावसाने हजेरी लावली असली तरी रॅलीची जय्यत तयारी सुरू असून जनशक्तीचे वादळच राजधानीत पाहायला मिळणार आहे. 'व्होट बचाओ, देश बचाओ' अशी साद घालत 'चलो दिल्ली'चा नारा देण्यात आला आहे. कितीही अडथळे आणा, ही रॅली होणारच, असे आज 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी ठणकावले.

विरोधी पक्षांची आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ'ब्रायन, महुआ मोईत्रा, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव, राजदचे संजय यादव, माकपचे जॉन ब्रिटास यांच्यासह आरएसपी, जेएमएम इत्यादी विरोधी पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची गच्छंती अटळ असून त्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असा इशाराच राहुल गांधी यांनी बैठकीनंतर दिला.

दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज अभिरूप संसद भरणार होती. त्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जन-महाभियोग चालवण्यात येणार होता. मात्र मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम आता उद्या शनिवारी होईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. लाखो लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत असल्याची भावना लोकांच्या मनात आहे. अदानी, नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि अमित शहा यांनाच मदत करण्यासाठी ही मतचोरी होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. संपूर्ण विरोधी पक्ष या ठिकाणी एकत्र आहे. आम्ही संविधान, मताधिकार आणि हिंदुस्थानच्या मूळ संकल्पनेच्या रक्षणासाठी उभे ठाकलो आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

मिंटो रोड आणि कॅनॉट प्लेस जंक्शन येथून महामार्च सुरू होऊन रामलीला मैदानापर्यंत जाईल. तिथे विराट सभा होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.