Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एरंडोलीतील सराईत गुन्हेगार सुशांत मोरे सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपारमिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

एरंडोलीतील सराईत गुन्हेगार सुशांत मोरे सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार
मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुशांत समाधान मोरे (वय २५, रा. एरंडोली, ता. मिरज, जि. सांगली) याला सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून एका वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. 

सुशांत मोरे याच्यावर शरीराविरुद्ध आणि महिलांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्या वास्तव्यामुळे परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांतअधिकारी मिरज यांच्याकडे सादर केला होता. सादर प्रस्तावावर सुनावणी व चौकशी पूर्ण करून उपविभागीय दंडाधिकारी विशाल यादव यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० वाजल्यापासून त्याला एका वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जारी केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल होळकर, पोलीस अंमलदार विकास भोसले, सुनंदा लोहार, सविता माळी आणि विश्वास पवार यांच्या पथकाने केली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या इतर सराईत गुन्हेगारांवरही हद्दपारीचे प्रस्ताव प्रस्तावित असून, गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.