तिसरी मुंबई ठरेल 'ग्रोथ इंजिन': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नैना'त १५ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य
पनवेल : खरा पंचनामा
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 'नैना' (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) क्षेत्राच्या विकासामुळे आर्थिक प्रगतीला नवे क्षीतिज खुले होणार आहे. भविष्यात 'नैना' परिसरात १५ लाख रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरढोण (ता. पनवेल) येथे केले. भविष्यात हा परिसर राज्याच्या विकासाचे 'ग्रोथ इंजिन' ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळभोवतालच्या 'नैना' परिसरातील विविध पायाभूत प्रकल्पांचे लोकार्पण आणि कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. 'नैना' परिसराचा विकास केवळ रस्ते, पूल आणि इमारतींपुरता मर्यादित नसून, तो रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीचे मोठे केंद्र बनू शकतो.
भविष्यात १५ लाख रोजगारांच्या संधी या परिसरात निर्माण होणार असून, त्यात पाच लाख नोकऱ्या उच्च कौशल्याधारित, तर दहा लाख नोकऱ्या मूलभूत व मध्यम वेतनाच्या असतील. त्यासाठी उद्योगांची उभारणी, कौशल्यविकास, प्रशिक्षण आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले जातील, असे फडणवीस म्हणाले. नवी मुंबई विमानतळावर प्रवासी आणि मालवाहतूक वाढत असल्याने परिसरात सक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी एसबीआर-९,
बीआर-४ आणि बीआर-५ या पुलांसह उरण बायपास पुलाचे बीआर-४ आणि बीआर-५ या पुलांसह उरण बायपास पुलाचे लोकार्पण करण्यात आले. पनवेल परिसरातून मुंबई, ठाणे, पुणे आणि उरणच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीसाठी या जोडमार्गांचा उपयोग होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे यांच्यासह इतर नेते व अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
