Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तासगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत विसापूर व पेडच्या संघांची बाजी

तासगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत विसापूर व पेडच्या संघांची बाजी

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय, तासगाव तालुका क्रीडा परिषद आणि जिल्हा परिषद शाळा, विसापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तासगाव तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि चुरशीने पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. चौदा वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या गटात विसापूरच्या माने-पाटील विद्यामंदिराने विजेतेपद पटकावले. तर पेड येथील बॅरिस्टर टी. के. शेंडगे विद्यालयाच्या संघांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.

स्पर्धेतील विजेते व उपविजेते संघ पुढीलप्रमाणे :
१४ वर्षांखालील मुले :
विजेता – रा. शा. माने-पाटील विद्यामंदिर, विसापूर.
उपविजेता – जिल्हा परिषद शाळा, नेहरूनगर, 

१७ वर्षांखालील मुले :
विजेता संघ – लक्ष अकॅडमी, मनेराजुरी, उपविजेता – बॅरिस्टर टी. के. शेंडगे विद्यालय, पेड.

१९ वर्षांखालील मुले : विजेता संघ स्वा. रा. भारती विद्यामंदिर, तासगाव, उपविजेता – लक्ष अकॅडमी, मनेराजुरी,

१४ वर्षांखालील मुली विजेता  संघ – रा. शा. माने-पाटील विद्यामंदिर, विसापूर, उपविजेता संघ – जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, विसापूर, 

१७ वर्षांखालील मुली विजेता संघ– सिद्धेश्वर हायस्कूल, तुरची.उपविजेता संघ  – बॅरिस्टर टी. के. शेंडगे विद्यालय, पेड, 

१९ वर्षांखालील मुली विजेता संघ – वसंतराव पाटील विद्यामंदिर, मांजर्डे, उपविजेता  संघ – स्वा. रा. भारती विद्यामंदिर, तासगाव. 

या स्पर्धेप्रसंगी विसापूर केंद्रप्रमुख अमोल कोठीवाले,वैभव बंडगर मुख्याध्यापक मनोजकुमार डांगे, मुख्याध्यापक शरद खरमाटे, के. पी. पाटील, अनंत मुंडे, सौरभ पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.