Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उजनी येथील पद्मावती मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या सोलापूरच्या वेळापूर पोलिसांची जलद कामगिरी!

उजनी येथील पद्मावती मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या 
सोलापूरच्या वेळापूर पोलिसांची जलद कामगिरी! 

सोलापूर : खरा पंचनामा 

कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उजनी तालुक्यांतील माढा येथील पद्मावती देवीच्या मंदिरांत चोरी करणाऱ्या आरोपीला वेळापूर पोलिसांनी जलद गतीने तपास करून बेड्या ठोकल्या आहेत कासलिंगबापू शिंदे रा. काटी ता. इंदापूर जि. पुणे ) असे आरोपींचे नाव आहे. 

उजनी येथील पद्मावती मंदिरात 6 लाख 45 हजार रूपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल  होती. वेळापूर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने हवा असणार आरोपी वेळापूर पोलिसांना मिळून आला. मात्र पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढला होता, आरोपी कासलिंग ने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींस कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक. प्रेरणा कट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस कर्मचारी नितीन लिगांडे, तानाजी पांढरे, सुनील पठाण, प्रवीण हिंगणगांवकर, सोनाली शिंदे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.