भाजपकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर !
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने तीन उमेदवारांच्या नावांना अधिकृत मंजुरी दिली आहे.
4 ऑक्टोबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकातून ही घोषणा करण्यात आली. यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. (श्रीमती) स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून श्री सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी श्री कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना भाजपने मैदानात उतरवले आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी या नावांना मान्यता दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना मिळालेली उमेदवारी विशेष चर्चेची ठरणार आहे. भाजपचे खासदार तरुण चुघ यांच्या स्वाक्षरीने हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. तरुण चुघ हे राज्यसभा खासदार असून भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाचे प्रभारी आहेत. 4 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.