Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपच्या मेळाव्यात शिवसेना तर शिवसेनेच्या मेळाव्यात भाजप आमदाराची पाठ, राजकारण तापलं

भाजपच्या मेळाव्यात शिवसेना तर शिवसेनेच्या मेळाव्यात भाजप आमदाराची पाठ, राजकारण तापलं

नागपूर : खरा पंचनामा 

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. महायुतीच्या वतीने भाजपचे सुधाकर कोहळे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी भंडाऱ्यात आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रचार सभा झाली.

मात्र, महायुतीचे भंडाऱ्यात दोन वेगवेगळे मेळावे आणि प्रचार सभा बघायला मिळाल्या. भाजपाचे नेते आमदार परिणय फुके यांनी शिवहरे कलार सभागृहात तर शिवसेनेकडून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संताजी सभागृहात मेळावा घेतला. विशेष म्हणजे, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत भंडारा शहरातच दोन्ही मेळावे होत असताना भाजप आमदार परिणय फुके आणि शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एकमेकांच्या मेळाव्याला जाणं टाळलं.

दरम्यान, शिवसेना मेळाव्यात आमदार भोंडेकर यांनी त्यांच्या मनातील खदखद आणि नाराजी महसूल मंत्र्यांच्या समोर आपल्या भाषणातून व्यक्त केली. तर, बावनकुळे यांनीही पक्ष संघटन आणि महायुती मजबूत करण्यासाठी आपसातील हेवेदावे आणि मतभेद सर्वांनी बाजूला करावे, असे कान टोचले. काँग्रेसला या निवडणुकीत धडा शिकवू सुधाकर कोहळे यांना मोठ्या मताधिक्यानं विजय करावं, असं आवाहन देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र भोंडेकर?

हा मेळावा नियोजित नव्हता, तर एका छोट्या बैठकीचे वेळेवर मोठ्या मेळाव्यात रूपांतर झाले, कारण एवढ्या मोठ्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी साधी बैठक शोभली नसती. चांगल्या विचारांच्या आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या किंवा पक्षाच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहिले पाहिजे, चुकीच्या व्यक्तींच्या पाठीशी उभं राहू नये राजकारणात विजय आणि पराजय चालत राहतो, परंतु खासगी पातळीवर किंवा वैयक्तिक कुटुंबावर धमक्या देण्याची भाषा करणे चुकीचे आहे. सर्व निवडणुका जिंकण्यासाठी एकमेकांच्या विरोधात न राहता सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, अन्यथा कोणाचेच भलं होणार नाही. राजकीय भाषेत विचार किंवा प्रतिवाद करण्यास कोणाचेही बंधन नाही, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, जर कोणी राजकीय लढाई सोडून खासही पातळीवर येऊन धमक्या देत असतील, तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.