Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपने विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडले पाहिजे, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

भाजपने विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडले पाहिजे, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (3 नोव्हेंबर) कार्टूनिस्ट आलोक निर्मित पु. ल. देशपांडे दिनदर्शिका 2027चे प्रकाशन केले. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात राज ठाकरेंनी पु. ल. देशपांडे यांच्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवरही निशाणा साधला. विरोधी पक्षांविरोधात भाजपने राज्यासह देशभरात 'लोकशाही वाचवा' हे आवाहन करत महायुती पदयात्रा काढत आहेत. यावरच राज ठाकरेंनी टीका केली. भाजप हा विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेरच आला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केले. तसेच, काँग्रेसबाबतही भाष्य केले आहे.

भाषणादरम्यान सध्याच्या काळात व्यंगचित्रावर गदा आल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "व्यंगचित्र आमच्या विरोधात काढायची नाहीत. आमच्या विरोधात लिहायचेही नाही, असे दिवस गेल्या 10-12 वर्षांमध्ये सुरु झाले असून हे अत्यंत विचित्र आणि घाणेरडे आहे." असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. "मला आठवते की बाळासाहेब ठाकरेंनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर अनेक व्यंगचित्र काढली होती. त्यांनी एकदा नेहरूंना स्वतःचे व्यंगचित्रही पाठवले होते. त्यावर नेहरूंनी सहीदेखील केलेली आहे. ते व्यंगचित्र बाळासाहेब ठाकरेंच्या पुस्तकामध्ये सहीसहित छापून आलेले आहे. चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार यांचे कौतुक करणे. तसेच, ते काय म्हणतात? हे समजून घेणे हे सर्व आता उरलेलेच नाही." असे म्हणत त्यांनी निराशा व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "मी जेव्हा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे जेव्हा बघतो तेव्हा एकच वाटते की, सत्ता येऊन किंवा बसून चालत नाही. तर, सत्ता ही अंगात आणि मनात असावी लागते. भाजप अजून विरोधी पक्ष भूमिकेतूनच बाहेर आलेला नाही. तसेच, काँग्रेसला अजूनही समजत नाही की, विरोधी पक्ष कसा असतो? गेल्या 5 वर्षांत काँग्रेसला समजायला लागले आहे." असे म्हणत त्यांनी काँग्रेसवरही भाष्य केले. "कालच भाजपने मोर्चा लोकशाही वाचवा हा मोर्चा काढला. हे सत्तेवर आहेत. सत्तेवरचा पक्ष हा मोर्चा काढतो लोकशाही वाचवा?" असे म्हणत टोला लगावला. तुम्ही सत्तेत आहात? तुम्ही कसले मोर्चे काढत आहात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. "विधान परिषदेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करतात?" असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. "मला आजपर्यंत आठवत नाही की, इतके पंतप्रधान होऊन गेले पण कोणी अशाप्रकारची कोणतीही विधाने केली असावीत. अशापद्धतीची प्रतिक्रिया कधीच कोणत्या पंतप्रधानांनी दिलेली नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली कारण, अजून विरोधी पक्ष या भूमिकेतूनच हे लोकं अजून बाहेर आलेले नाहीत." असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवरून निशाणा साधला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.