Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईश्वरपूरमधील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी २४ तासांत जेरबंद

ईश्वरपूरमधील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी २४ तासांत जेरबंद

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यात ईश्वरपूर येथील कामेरी नाका परिसरात घडलेल्या एका खळबळजनक खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत जेरबंद केले आहे. सुरज महादेव कांबळे (वय ३१, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) असे खून झालेल्या मयताचे नाव असून, साहिल अनिल कांबळे (वय २७) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय ३०, दोघेही रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास कापड दुकानात झालेला वाद आणि पूर्ववैकमानसातून झालेल्या पूर्ववादाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून सुरज कांबळे यांच्यावर कोयता व चाकूने डोक्यात, कपाळावर, चेहऱ्यावर, पोटात व पाठीवर वार केले. या गंभीर हल्ल्यात ते जागीच जखमी होऊन मयत झाले, ज्याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.

तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी कासेगाव ते कराड हायवेरोडवरील हॉटेल ९६ कुळी समोरील परिसरात सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांनी पूर्वरागातून कापड दुकानातील भांडणाच्या वादातून व पूर्वीचे लग्न मोडल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस निरीक्षक संदीप पाटील या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक समाधान घुगे, राहुल पाटील संदिप गुरव, अरूण पाटील, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, सुरज थोरात, संकेत कानडे, पवन सदामते, सोमनाथ पतंगे, विनायक सुतार, ईश्वरपूर पो. ठाणे कडील कुबेर खोत, दिपक घस्ते, अमोल सावंत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे सायबर पोलीस ठाणेकडील इम्रान महालकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.